किल्ले तुंगी कर्जत
मी, अभिजित ,कौस्तुभ (kp),शर्वरिश आणि सर्वेश असे पाच जण सह्याद्रीत भटकत असतो,रायगड जिल्ह्यातील जवळपास सगळे किल्ले बघून झाले होते पण एक अपरिचित किल्ला आमचा राहिला होता तर हा ब्लॉग आहे त्याचं किल्ल्याचा तो किल्ला म्हणजे "तुंगी" तुंगीम्हणजे लोणावळ्याच्या जवळील तुंग नाही हा तुंगी म्हणजे भीमाशंकर च्या रानातील दडलेल्या एका
अपरिचित किल्ल्याचा.भीमाशंकर च्या दोन प्राचीन व्यापारी घाट वाटा कर्जत च्या जवळ असलेल्या खांडस गावात येतात (शिडी घाट, गणपती घाट). प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला किव्हा टेहेळणी बुरुज तेथे असणे हे गरजेचे होते. त्या वाटांवर लक्ष ठेवण्या साठी पदर गडाची निर्मिती केली गेली असावी. ह्या गडाला लागूनच एक डोंगर आहे तो डोंगर तो किल्ला म्हणजे तुंगी किल्ला.
रविवार चे अवचित्त्य साधून सकाळी लवकर निघालो आणि थेट ठाकूरवाडी गाठली . तेथून सुरवातीला पक्का रस्ता आहे, साधारण दोन एक किलोमीटर गाडी वर पर्यंत जाते पण तेथून मात्र खरा चढ सुरू होतो. गर्द झाडी आणि कानावर पडणारा सुमधुर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आम्ही वर चढत होतो. खडी चढाई असली तरी सतत गार वारा असल्याने दमायला होत नव्हते मध्येच पावसाची सर तो गारवा वाढवतच होती.साधारण ४०-४५ मिनिटात आपण तुंगी वाडीत पोहोचतो. वाडी मध्ये तुंगाई माते चे मंदिर आहे. ह्या देवी मुळेच बहुदा ह्या गडाचे नाव तुंगी पडले असावे; मंदिरात देवीची जुनी पाषाणातील मूर्ती आहे व तिला लागूनच शिवलिंग आहे,नागाची मूर्ती सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे ह्या मंदिरात वाघदेव सुद्धा आहे. मी वाघदेव ह्या आधी लाकडाचा पहिला होता पण दगडातला इथे पहिल्यांदा
पहिला.मंदिराच्या समोरच ५ वीरांच्या समाध्या सुद्धा आहेत. त्या मंदिराच्या बाजूनेच एक वाट वरती गडावर जाते. त्या वाटेला पकडून चालत गेल्यास आपण साधारण पंधरा ते वीस मिनिटात गडावर पोहोचतो.
गडावर एक पाण्याची टाकी आहे, तसेच अनेक ऐतिहासिक खुणा देखील तिथे आपल्याला बघायला मिळतात.गडावर आपला भगवा ध्वज नव्हता म्हणून आम्ही आमच्या कडचा ध्वज तेथे लावला.
गडावरून पदरगड, भीमाशंकर घाट, पेठ चा किल्ला, पेब चा किल्ला, चंदेरी , सिद्धगड पर्यंतचा परिसर आपणास बघायला मिळतो. गडावरून अनेक घाट वाटा सुद्धा दिसतात त्यात फेण्यादेवी, बैलदारा, वांद्रे, नखिंदा घाट ह्या वरूनच ह्या गडाचा टेहेळणी साठी वापर केला गेला असावा असे वाटते. भीमाशंकर अभयारण्य जवळ असल्याने ह्या डोंगरावर विविध
प्रकारचे वन्य प्राणी आढळून येतात.भेकर व बिबट्या पावसाळ्यात अनेकदा दिसतात असे ग्रामस्थांनी सांगितले.गावात आल्यावर तुंगी डोंगराचा पूर्ण परिसर बघायला सुरुवात केली आणि त्याला साथ लाभली ती गावातील आनंदा दादाची. दादा घरातून निघतानाच हातात दोर घेऊन निघाला नक्की हा दोर कश्या साठी ह्याचा प्रश्न आम्हाला पडला होता. तो आम्हाला तुंगी वर येणाऱ्या प्रत्येक वाटा दाखवत गेला आणि आम्ही सोबत फिरत होतो.
पावसा मुळे पूर्ण डोंगर हिरव्या मखमली शालुत गुरफटला होता.खांडस तुंगी वाट,पदरगड तुंगी वाट. ह्या वाटा बघून झाल्यानंतर दादाने आम्हाला विचारले आजुन दोन वाटा आहेत दमले आहात का फिरायच आजुन ? मी दमलो होतो पण बाकीचे जोशात होते. मग मी पण म्हंटल
चला दादा फिरुया. मग दादाने आम्हाला नेले ते म्हणजे टेंभरे शिंगढोल ह्या गावी उतरणारी वाट दाखवायला... मी उभा होतो आणि दादा म्हणाले ह्या कड्याच्या बाजून उतरायचं आहे...हे ऐकल्यावर थोडा घाम फुटला होता पण उतरलो नाही तर कसला सह्याद्री मध्ये फिरणारा वेडा म्हणून आम्ही चौघे उतरायला लागलो. सोबत दादा होताच जरा खाली उतरल्यावर लगेच कातळात कोरीव पायऱ्या दिसल्या कदाचित पूर्वीच्या काळी हाच मुख्य
रस्ता असावा...दादाच्या बोलण्यातून समजले की ह्याच रस्त्याने खाली उतरून पूर्वी लोकं पेठ ला जायची किंव्हा वांद्रे घाटातून वर मावळात...तिथून खाली उतरल्यावर एक झाड होते आणि लगेच दादाने दोर काढली आणि झाडाला बांधली आणि सरळ खाली सोडून दिली...
कौस्तुभ खाली बघायला गेला आणि म्हणाला मंदार दादा तू तिथेच थांब मला समजले नाही हा असे का म्हणाला म्हणून मी पुढे गेलो तर १५ फूट उभा कातळ होता मग मीच स्वतःच मागे झालो 😂.( दोरीचा वापर ह्या साठी होता ते कळाले) शरू ,सर्वेश,kp अभ्या आणि दादा हे त्या दोराने खाली उतरले आणि बाजूच्या कडे ने खाली जाऊ लागले.. काही वेळाने दिसेनासे
झाले.. मी हाक मारल्यावर बराच वेळाने ह्यांची ओ येयची... मी kp ला फोन केला आणि विचारले all ok ? म्हणाला दादा अरे स्वर्ग आहे खाली फोटो दाखवतो म्हटल ठीक आहे नीट या वर आणि २० मिनटात हे ४ घे आणि दादा पुन्हा नजरेस पडले दोरीने वर आल्यावर त्याने तिथे दोन पाण्याची टाकी आणि एक कुंड आहे असे सांगितले.. वर आल्यावर पाऊस जरा जास्तच जोरात पडत होता...
मग आम्ही तिथेच आनंद दादाच्या शेतात kp ने आणलेल्या चहा चा आस्वाद घेतला kp चा चहा म्हणजे जन्नतच... चहा पिऊन झाल्यावर शेताच्या बांध्या वरून आम्ही धोत्रे गावच्या वाटेवर जायचे ठरवले आणि ती वाट कुठे आहे ते बघितले...वरून तरी ती वाट सोपी वाटत होती आणि आनंद दादाच्या म्हणण्या नुसार सुद्धा सगळ्यात सोपी वाट तीच होती... त्या
मार्गाची टेहेळणी करून आम्ही पुन्हा खिंडीतून तुंगी वाडीत आलो.. तुंगाई मातेचे दर्शन घेतले.. वाघदेवता ..शिवलिंग ह्याचे दर्शन घेऊन अनंदा दादाच्या घरी गेलो मग आनंद दादाचा निरोप घेऊन गडाच्या पाया पडून परतीचा प्रवास सुरू केला... गड उतरायला एक तास सहज पुरतो... एकदा ह्या किल्ल्यास अवश्य भेट द्या.
@मंदार लेले




Waah sundar lekhan 👌🏻👌🏻
ReplyDeleteThanks kp
Deleteखूप छान.असच लिहित राहा.तुझे अनुभव इच्छुकांना मार्गदर्शन करतील.
ReplyDeleteThanks aai
Delete