Posts

किल्ले तुंगी कर्जत

Image
मी, अभिजित ,कौस्तुभ (kp),शर्वरिश आणि सर्वेश असे पाच जण सह्याद्रीत भटकत असतो,रायगड जिल्ह्यातील जवळपास सगळे किल्ले बघून झाले होते पण एक अपरिचित किल्ला आमचा राहिला होता तर हा ब्लॉग आहे त्याचं किल्ल्याचा तो किल्ला म्हणजे "तुंगी" तुंगीम्हणजे लोणावळ्याच्या जवळील तुंग नाही हा तुंगी म्हणजे भीमाशंकर च्या रानातील दडलेल्या एका अपरिचित किल्ल्याचा.भीमाशंकर च्या दोन प्राचीन व्यापारी घाट वाटा कर्जत च्या जवळ असलेल्या खांडस गावात येतात (शिडी घाट, गणपती घाट). प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला किव्हा टेहेळणी बुरुज तेथे असणे हे गरजेचे होते. त्या वाटांवर लक्ष ठेवण्या साठी पदर गडाची निर्मिती केली गेली असावी. ह्या गडाला लागूनच एक डोंगर आहे तो डोंगर तो किल्ला म्हणजे तुंगी किल्ला. रविवार चे अवचित्त्य साधून सकाळी लवकर निघालो आणि थेट ठाकूरवाडी गाठली . तेथून सुरवातीला पक्का रस्ता आहे, साधारण दोन एक किलोमीटर गाडी वर पर्यंत जाते पण तेथून मात्र खरा चढ सुरू होतो. गर्द झाडी आणि कानावर पडणारा सुमधुर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आम्ही वर चढत होतो. खडी चढाई असली तरी सतत गार वार...

फेण्यादेवी घाट

Image
              रविवार म्हणजे ट्रेक चा दिवस आज आम्ही कर्जत च्या जवळ असलेला फेण्यादेवी घाट करायचे ठरवले. आज आमचे नेहेमीचे मेंबर्स kp अभ्या दीपक आणि मी असे चौघे आणि आज दोन नवीन मेंबर्स जॉईन झाले ते म्हणजे माझा वर्ग मित्र रितेश जुन्नरकर आणि डोंबिवलीचा क्रिकेट क्लब चालवणारा कौस्तुभ परांजपे. असे आम्ही ६ जण फेण्यादेवि घाट वाट हा ट्रेक करण्यासाठी निघालो. कर्जत वरून सकाळी ७ ला दीपक ने एसटी जशी प्रत्येक थांब्यावर एक एक प्रवाश्यांना घेते तसा तो एक एक ट्रेक मेंबर्स च्या थांब्यावरून प्रत्येकाला उचलत होता शेवटी ७.३० ला आमचा प्रवास सुरु झाला आणि ८.१० ला आम्ही मोग्रज गाठले.            मोग्रज जवळ असलेल्या चौधरी वाडीतून आणि मोग्रज वरून दोन रस्ते कळकराई वाडीत जातात. एक थोडी लांबची पण सर्वांच्या सोयीची 'गायदरा' तर दुसरी उभ्या चढणीची नाळेची वाट. पावसात अर्थातच गायदरा जास्त वापराची. तिथेच गावातल्या लोकांसोबत चर्चा करून, त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेत नाळेच्या वाटेला लागलो. वाट झक्क मळलेली कळकराईतील बरीच मंडळी कर्जत एस टी साठी या वाटेने...