Posts

Showing posts from April, 2025

किल्ले तुंगी कर्जत

Image
मी, अभिजित ,कौस्तुभ (kp),शर्वरिश आणि सर्वेश असे पाच जण सह्याद्रीत भटकत असतो,रायगड जिल्ह्यातील जवळपास सगळे किल्ले बघून झाले होते पण एक अपरिचित किल्ला आमचा राहिला होता तर हा ब्लॉग आहे त्याचं किल्ल्याचा तो किल्ला म्हणजे "तुंगी" तुंगीम्हणजे लोणावळ्याच्या जवळील तुंग नाही हा तुंगी म्हणजे भीमाशंकर च्या रानातील दडलेल्या एका अपरिचित किल्ल्याचा.भीमाशंकर च्या दोन प्राचीन व्यापारी घाट वाटा कर्जत च्या जवळ असलेल्या खांडस गावात येतात (शिडी घाट, गणपती घाट). प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला किव्हा टेहेळणी बुरुज तेथे असणे हे गरजेचे होते. त्या वाटांवर लक्ष ठेवण्या साठी पदर गडाची निर्मिती केली गेली असावी. ह्या गडाला लागूनच एक डोंगर आहे तो डोंगर तो किल्ला म्हणजे तुंगी किल्ला. रविवार चे अवचित्त्य साधून सकाळी लवकर निघालो आणि थेट ठाकूरवाडी गाठली . तेथून सुरवातीला पक्का रस्ता आहे, साधारण दोन एक किलोमीटर गाडी वर पर्यंत जाते पण तेथून मात्र खरा चढ सुरू होतो. गर्द झाडी आणि कानावर पडणारा सुमधुर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आम्ही वर चढत होतो. खडी चढाई असली तरी सतत गार वार...