फेण्यादेवी घाट
रविवार म्हणजे ट्रेक चा दिवस आज आम्ही कर्जत च्या जवळ असलेला फेण्यादेवी घाट करायचे ठरवले. आज आमचे नेहेमीचे मेंबर्स kp अभ्या दीपक आणि मी असे चौघे आणि आज दोन नवीन मेंबर्स जॉईन झाले ते म्हणजे माझा वर्ग मित्र रितेश जुन्नरकर आणि डोंबिवलीचा क्रिकेट क्लब चालवणारा कौस्तुभ परांजपे. असे आम्ही ६ जण फेण्यादेवि घाट वाट हा ट्रेक करण्यासाठी निघालो. कर्जत वरून सकाळी ७ ला दीपक ने एसटी जशी प्रत्येक थांब्यावर एक एक प्रवाश्यांना घेते तसा तो एक एक ट्रेक मेंबर्स च्या थांब्यावरून प्रत्येकाला उचलत होता शेवटी ७.३० ला आमचा प्रवास सुरु झाला आणि ८.१० ला आम्ही मोग्रज गाठले. मोग्रज जवळ असलेल्या चौधरी वाडीतून आणि मोग्रज वरून दोन रस्ते कळकराई वाडीत जातात. एक थोडी लांबची पण सर्वांच्या सोयीची 'गायदरा' तर दुसरी उभ्या चढणीची नाळेची वाट. पावसात अर्थातच गायदरा जास्त वापराची. तिथेच गावातल्या लोकांसोबत चर्चा करून, त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेत नाळेच्या वाटेला लागलो. वाट झक्क मळलेली कळकराईतील बरीच मंडळी कर्जत एस टी साठी या वाटेने...