फेण्यादेवी घाट
रविवार म्हणजे ट्रेक चा दिवस आज आम्ही कर्जत च्या जवळ असलेला फेण्यादेवी घाट करायचे ठरवले. आज आमचे नेहेमीचे मेंबर्स kp अभ्या दीपक आणि मी असे चौघे आणि आज दोन नवीन मेंबर्स जॉईन झाले ते म्हणजे माझा वर्ग मित्र रितेश जुन्नरकर आणि डोंबिवलीचा क्रिकेट क्लब चालवणारा कौस्तुभ परांजपे. असे आम्ही ६ जण फेण्यादेवि घाट वाट हा ट्रेक करण्यासाठी निघालो. कर्जत वरून सकाळी ७ ला दीपक ने एसटी जशी प्रत्येक थांब्यावर एक एक प्रवाश्यांना घेते तसा तो एक एक ट्रेक मेंबर्स च्या थांब्यावरून प्रत्येकाला उचलत होता शेवटी ७.३० ला आमचा प्रवास सुरु झाला आणि ८.१० ला आम्ही मोग्रज गाठले.
मोग्रज जवळ असलेल्या चौधरी वाडीतून आणि मोग्रज वरून दोन रस्ते कळकराई वाडीत जातात. एक थोडी लांबची पण सर्वांच्या सोयीची 'गायदरा' तर दुसरी उभ्या चढणीची नाळेची वाट. पावसात अर्थातच गायदरा जास्त वापराची. तिथेच गावातल्या लोकांसोबत चर्चा करून, त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेत नाळेच्या वाटेला लागलो. वाट झक्क मळलेली कळकराईतील बरीच मंडळी कर्जत एस टी साठी या वाटेने कमीत कमी वेळात ये जा करतात. तिरकी वळणे घेत वाट चढू लागली, पहिला छोटा झाडीचा टप्पा पार करून बाहेर आलो तर डावीकडे दरीपल्याड कोथळीगड डोकावला. ही चढाई जवळपास कोथळी गडाच्या चढाई इतकीच उंच असावी कारण कळकराई च्या पठारावरून पेठ चे पठार समांतर उंचीचे दिसत होते. कळकराईच्या पठारावर पोहोचताच तिथे काही तांदळा स्वरूपातील गावदेव दिसले त्यांच्या पाया पडून प्रवास सुरू केला. वाटेत पिकलेल्या करवंदाची जाळी आली आणि आमचा ट्रेक थांवण्यासाठी योग्य कारण ठरली.सगळे जण त्या करवंदांवर तुटून पडले १५ मिनिटे झाले असतील करवंदाची जाळी जी भरलेली होती त्या जाळीवर इथे करवंद होती असे सांगायला लागले. करवंदाची न्याहारी करून आम्ही रस्ता पकडला. साधारण ५-१० मिनटात आम्ही मुख्य कळकराई च्या पठारावर लागलो. समोर वांद्रे घाटाच्या वर असलेल्या पवनचक्क्या दिसत होत्या त्यांना ढगांनी मस्त अच्छादले होते. त्याचे लगेच दीपक आणि kp ने फोटो काढले आणि आम्ही पुढे निघालो कळकराई गावात गेल्यावर तिकडे लोकांना विचारल्यास समजले की कळकराई गावातून उजवीकडे जी वाट जाते ती म्हणजे फेण्यादेवी ची वाट. मग आम्ही ती वाट पकडून प्रवास सुरू केला. साधारण ५ मिनटे चालल्यावर एका उंबराच्या झाडा खाली भैरोबाचे मंदिर आहे त्याच्या पाया पडलो आणि फेण्यादेवी घाट गाठायला सुरुवात केली आणि घनदाट जंगलात आमचा प्रवेश झाला.
![]() |
| दूर दिसणाऱ्या पवनचक्क्या |
![]() |
| कळकराई गावातून दिसणारा पेठ(कोथळीगड) चा किल्ला |
![]() |
| कळकराई गावाजवळून दिसणारा फेण्या देवी घाट आणि सावळा पठार |
जंगल इतके घनदाट की तिथले वृक्ष म्हणजे उंच उंच आभाळाशी स्पर्धा करणारे मोठमोठे महाकाय वृक्ष अगदी टिपिकल भीमाशंकर अभयारण्य.त्या वृक्षांची खोड म्हणजे माझ्या सारखे निदान ३-४ जण त्याला घेरा करायला लागतील इतके मोठे.तिकडेच जंगलात थांबून आम्ही kp ने आणलेल्या चहाचा आस्वाद घेतला.जंगलात मस्त पक्ष्यांचा आवाज येत होता मधेच एखादे वानर ओरडत होते आणि तिथून हलुच नये असे वाटणे म्हणजे टिपीकल घनदाट जंगलाचा आनंद लुटणे. चहा चा आणि जंगलाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. वाटेत काही गावकरी झाडांवर चढून आळू काढत होते त्यांच्या कडून काही आळू घेतले आणि खात खात ट्रेक सुरु ठेवला. घनदाट झाडी आणि पुढे लागली ती खडी चढण. ही चढण खरोखर आपला कस बघते साधारण २० मिनिटे चढून वर गेल्यावर एक सुकलेला धबधबा लागला तिथे काही लोखंडी पाईप लावले होते बहुतेक पावसाळ्यात वाटाड्याना पाण्याच्या प्रवाहात मदत व्हावी म्हणून हे लावले असावे. त्यांचीच मदत घेऊन आम्ही ते मोठ्ठे कातळ ओलांडले आणि वरून खाली उतरताना काही ५-६ वयस्कर व्यक्ती दिसल्या.अभ्याने लगेच त्यांची विचारपूस सुरू केली आणि समजले की ते सगळे ६०+ वयाचे आहेत आणि १००० पेक्षा जास्त ट्रेक केलेले आहेत. १००० पेक्षा जास्त ट्रेक केलेली माणसे भेटण म्हणजे आमचं नशीबच. त्यांच्याशी संवाद साधल्यावर समजले की ते सावळा गावातून ह्या घाट वाटेतून उतरून संध्याकाळी पुन्हा चढणार होते त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि ट्रेक सुरू केला. उभा चढ आमची परीक्षा घेत होता humidity जास्त असल्याने खूप दमछाक होत होती.
![]() |
| वाटेत लागणारा झरा आणि त्यात असलेला कातळ भाग |
![]() |
| फेण्या देवी घाटातून दिसणारे जंगल |
थोडे वर गेल्यावर साधारण १५ मिनटात आपण फेण्यादेवी मंदिरा जवळ येतो. घाटात उजवीकडे देवीचे मंदिर आहे आम्ही दर्शन घेतले आणि माझी दमछाक झाल्याने माझा वेग थोडा कमी झालेला अभ्या आणि दीपक ला समजले, लगेच आम्ही ६ जण २ गटात विभागलो दीपक अभ्या आणि कौस्तुभ हे पुढे गेले वरती जाऊन काही जेवण्याची सोय होते का बघायला हे तिघे पुढे गेले आणि मी मागे एकटा नको पडायला म्हणून रितेश आणि kp माझ्या सोबत थांबले .थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा ट्रेक सुरू केला आणि २० मिनटात आम्ही सावळा पाठरावर पोहोचलो वर गेल्यावर लांबून कौस्तुभ चालत येताना दिसला. तो म्हणाला की वरती कुठेच जेवणाची सोय होत नाही आहे म्हणून अभ्या आणि दीपक पुढे काही खायला मिळत का बघायला गेलेत. त्यांची वाट बघत आम्ही खाली सावलीत बसलो होतो.
![]() |
| फेण्या देवी मंदिर |
साधारण १५ मिनिटांनी हे दोघे आले सोबत बिस्किटे आणि साबुदाणा चिवडा इतकं त्यांना मिळालं होत. आम्ही पुन्हा आलो त्याच मार्गाने उतरायला सुरुवात केली.वाटेत कातळावर बसून आणलेला चिवडा आणि बिस्किटे खाल्ली आणि उतरायला सुरुवात केली उतरताना एक आजी तिच्या नाती सोबत वर चढताना दिसल्या त्यांची विचारपूस केली असता समजले की कळकराई वरून रेशन चे दुकान सावळा गावी असल्याने त्यांना नेहमी असे जावे लागते. त्या छोट्या मुलीला अभ्याने बिस्कीट तर रितेश ने त्याच्या कडची पाण्याची बाटली दिली. त्यांचे ते जीवन जगणे पाहून आपण किती सुखात जगतोय ह्याची जाणीव झाली.आलो त्या वाटेने खाली उतरून आम्ही कळकराई गावात आलो आणि परतीचा प्रवास सुरू केला.
![]() |
| डावी कडून दीपक, रितेश, मी, अभिजित, कौस्तुभ परांजपे (डोंबिवली) आणि कौस्तुभ परांजपे कर्जत. |
इतिहास :- पेठ भीमाशंकर येथून बऱ्याच घाट वाटा ह्या मावळात जातात त्यात कुसुर घाट, फेण्यादेवी घाट, बैलदरा, वांद्रेघाट, भीमाशंकर घाट आणि पुढे मुरबाड मधले घाट. प्रामुख्याने ह्या घाटवाटांचा उपयोग ये जा करण्यासाठी, माल वाहतुकीस सोपा आणि जलद गतीचा मार्ग म्हणून, सैन्यास ये जा करण्या साठी होत असे. तसेच प्रत्येक घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे गड किल्ल्यांची निर्मिती सुद्धा केलेली असत, त्यामुळे ह्या घाटवाटांची सफर करणं म्हणजे इतिहास आणि भूगोल जगणच आहे.घाट वाट उतरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
भेटू आता लवकरच अजुन एक इतिहासाची साक्ष देणारी घाटवाट घेऊन.
जय श्री राम जय शिवराय.







👌👌👌
ReplyDeleteखूप छान मंदार, ट्रेकिंग आणि लेखन दोन्ही छंद अप्रतिम, आणि इतके बारकाईने मुद्दे मांडलेत की पुढे जाणार्यांना मदत नक्कीच होईल 👍🏻
Deleteधन्यवाद दादा
Delete🔥👌👌
ReplyDeleteThanks
DeleteEk number
ReplyDeleteThanks bhau
Deleteअप्रतिम लेखन 👌🏻🔥
ReplyDeleteखूप छान लिखाण.असेच लिहित राहा तुला खूप शुभेच्छा
ReplyDeleteThanks aai
Deleteखूप छान लिहितोस मित्रा.
ReplyDeleteThank you
Deleteछान लिहिलं आहेस.
ReplyDeleteThank you
DeleteAmazing writing skills! Keep it up, Professor! 👍
ReplyDeleteWonderful
ReplyDelete